रामायण | एक सांस्कृतिक दस्तऐवज
By Sachin Mohan Chobhe
Narrated by Artist 1 : AI Reader
About this audiobook
रामायण हे महाकाव्य म्हणजे फक्त धार्मिक ग्रंथ नाही, तर तो एक सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक दस्तऐवज आहे. महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेले रामायण म्हणजे भारतीय समाजाच्या मूल्यव्यवस्थेचा खराखुरा आरसा आहे. यातील राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, भरत, शबरी, केवट, सुग्रीव, विभीषण आदि सर्व पात्र हे वेगवेगळ्या सामाजिक स्तरांची प्रतिनिधी आहेत. राजा आणि प्रजा, स्त्री आणि पुरुष, मित्र आणि शत्रू, मानव आणि वानर असे सगळेच या कथेत एकत्र येतात आणि एक व्यापक मानवी महाकथा उभी राहते.
Chapters (1)

1. लेखक मनोगत
रामाच्या व्यक्तिरेखेकडे पाहिले तर तो ‘देव’ म्हणून नाही, तर ‘आदर्श माणूस’ म्हणून अधिक तो प्रभावी वाटतो. तो दुःखी होतो, तो द्विधा मनःस्थितीत सापडतो, तो निर्णय घेताना वेदना सहन करतो. वडिलांच्या आज्ञेसाठी राजसिंहासन सोडून वनवास पत्करणे, पत्नीच्या शोधासाठी संपूर्ण जग पालथे घालणे, प्रजेसाठी स्वतःच्या वैयक्तिक सुखाचा त्याग करणे. हे सगळे निर्णय सहज नाहीत. ते मानवी वेदनांनी भरलेले आहेत. म्हणूनच राम हा देव असूनही आपल्याला ‘आपलासा’ वाटतो.
Don't have the app yet? Download Shrota to start listening.